जनतेज न्युज

`उध्दव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगला – रामशेठ ठाकूर

प्रतिनिधी, नवीमुंबई : प्रस्तावित नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक नामकरण कृती समितीच्या वतीने अनेक आंदोलने केली गेली,समितीचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावर बोलताना,मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना स्थानिक कार्यकर्त्यांनी काहीही सांगितले तरी आपल्या शैलीप्रमाने निर्णय घेणे आपेक्षित आहे,बाळासाहेब ठाकरे यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि उध्दव ठाकरेंची पद्धत यात तफावत असून त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना लक्षात घेऊन याबाबत योग्य निर्णय घ्यावा,कारण उध्दव ठाकरे हे माणूस म्हणून खूप चांगले आहेत,माझे खूप वेळा त्यांच्याबरोबर राजकीय बोलणे झाले असून,पण एकमेकांचे कधी जुळले नाही असेही रामशेठ ठाकूर म्हणाले..