प्रतिनिधी, नागपुर : सरोगसीच्या नावावर प्रेमप्रकरणातून जन्माला आलेल्या नवजात मुलीची विक्री करणाऱ्या डॉक्टर आणि त्याच्या दलालाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. या डॉक्टरने ज्यांना नवजात मुलीची विक्री केली, त्यांना ते बाळ सरोगसी मातेकडून जन्माला आल्याचे सांगितले होते. या प्रकरणाची गुप्त तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून डॉक्टर विलास भोयर, राहुल निमजे आणि नरेश राऊतला अटक केली आहे. पोलिसांच्या एका पथकाने हैदराबाद येथे जाऊन बाळासह एका दाम्पत्याला ताब्यात घेतले आहे.
