प्रतिनिधी, सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची सर्व साधारण सभा उधळून लावण्याचा प्रयत्न आज झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी बॅंकेत घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना गेटवर अडवलं. परिणामी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. यावेळी पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
मुख्य कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. राजकीय नेत्याच्या संस्थांना १०० कोटींचे व्याज माफ करण्याचा बॅंकेने प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाविरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसते.
