प्रतिनिधी, जालना : भाजपचेच 25 आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. ते जालन्यात बोलत होते. काल रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील 25 नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं यावर उत्तर देताना भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये दानवे खोटं बोलत असल्याचं सांगत भाजपचेच 25 नाराज आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे सत्तार म्हणाले. दानवे यांचा गौप्यस्फोट म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा असल्याचं सांगत सत्तार यांनी दानवे यांची खिल्ली उडवली.आज जालन्यात पंचायत समिती कार्यालयाचे सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण झाले त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार मधील प्रमुख नेते घेतील अशी माहितीही सत्तार यांनी दिली.
