प्रतिनिधी, जालना : एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.ते जालन्यात बोलत होते.जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला असंही ते म्हणाले. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षां सोबत आम्ही यायला तयार आहोत असंही जलील यांनी प्रस्ताव ठेवताना सांगितलयाचं टोपे म्हणाले.
