जनतेज न्युज

आप चे मंत्री बीडच्या दौऱ्यावर; सर्वसामान्यां साठी इतर सरकार काम करत नसेल तर आप करणार – राजेंद्र पाल मंत्री आप

प्रतिनिधी, बीड : पंजाब मध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानं आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले राजेंद्र पाल गौतम हे महिला व बालविकास मंत्री बीड दौऱ्यावर आले असता, आपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठे जल्लोषात स्वागत केलं आहे. जे सरकार आरोग्य आणि उत्तम शिक्षक सरकारी खर्चातून देणार नाही. त्या ठिकाणी आम आदमी सरकार काम करणार असल्याच राजेंद्र पाल यांनी बीडमध्ये सांगितले आहे. महाराष्ट्र सरकारने शिक्षण, आरोग्य आणि शेतकऱ्यांसाठी काम करावे जेणेकरून या घटकांचे सक्षमीकरण होईल. जर हे काम सरकारने केले तर आम आदमी पार्टीला येण्याची गरज नाही. मात्र ज्या राज्यात असे होणार नाही तिथे आम आदमी पार्टी जाणार आहे.