जनतेज न्युज

शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणावर आधारित शेती केली पाहिजे – पंजाबराव डक

प्रतिनिधी, नाशिक : शेतकऱ्यांनो हवामानावर आधारित शेती करा, बदलत्या वातावरणावर आधारित शेती करा, ही काळाची गरज आहे यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्याख्यान प्रसंगी हवामान तज्ञ पंजाबराव डक हे येवला तालुक्यातील नागडे या गावी आले असता यावेळी पत्रकारांनी पावसाळा व उन्हाळ्यातील हवामानातील बदल याबद्दल विचारले असता.यावेळी पंजाबराव म्हणाले की.निसर्ग बदलत असून हवामान देखील हवामानात देखील सतत बदलत असल्यामुळे त्यानुसार शेती करणे गरजेचे असून 21, 22, 23 मार्च पर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे काही भागांमध्ये रात्री बारीक रिमझिम पावसाची शक्यता देखील आहेत. तसं नाशिक विभागात पाऊस पडणार असून येवल्यात देखील रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे. इथून पुढच्या हवामाना प्रत्येक विषय निघाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो वातावरण काय बदलत राहिले. पृथ्वीचं तापमान वाढत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीला सामना करावा लागला. त्याच्यामुळेच आपल्याला वातावरण कमी करण्यासाठी झाडे लावावे लागतील आणि पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी सगळ्यांना हातभार लावावा लागेल. या वर्षीचा हवामान अंदाज पाहता उन्हाळ्यामध्ये सुद्धा एकादा तपामान हाय होणारं लगेच  44, 45 पर्यंत जाणार आणि परत एकदा परत लो होणार पावसाची शक्यता होणार. एकदा उष्णता राहणार आणि परत एकदा एका महिन्यात पाऊस येणार असे वातावरण राहणार आहे.