प्रतिनिधी, सोलापूर : सराईत मोटरसायकल चोराकडून 3 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली जप्त करण्यात सदर बाजार पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले आहे.
अमरिश पुजारी यांची सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून मोटर सायकल चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली होती.त्या अनुषंगाने तपास करत असताना कुमार चौकात पुजारी यांच्या तक्रारीत मोटारसायकल क्रं.MH13 CF 5571 यावरून संशयित आरोपी जात असल्याचे त्यांना दिसले. त्याला थांबवून सदर मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन त्याला मोटरसायकल बाबत विचारले असता सदर बाझार पोलीस ठाणे हद्दीतील चार , विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील एक आणि एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एक तर आणखी एका अशा सात मोटरसायकली मिळून आले आहेत.याबाबत आरोपी चंद्रकांत विष्णू गंतेलू वय 32 , रा.केशव स्मृती झोपडपट्टी , 145 रेल्वे लाइन्स , सोलापूर याला अटक केली असून याने अन्य काही गुन्हे केले आहेत का ? याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले.
