जनतेज न्युज

द्राक्ष उत्पादनाला मराठवाड्यातही उत्तम वातावरण औरंगाबाद तालुक्यातील द्राक्षशेती ठरत आहे कुतूहलाचा विषय

प्रतिनिधी, औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद तालुक्यातील गोपाळपूर येथील छगन वडेकर या शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतात द्राक्ष उत्पादनाची शेती करून मिळणाऱ्या द्राक्ष उत्पादनातून स्वतःला आर्थिक उभारी दिलीय द्राक्ष शेती म्हटले की नाशिक जिल्ह्याचच नाव समोर येतं मात्र मराठवाड्यात आपल्या तीन एकरात छगन वडेकर यांनी द्राक्षाची बाग फुलवल्याने त्यांच्या या द्राक्ष शेतीकडे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या कुतूहलतेने पहात आहेत

मराठवाड्यातही द्राक्ष शेतीसाठी नाशिक पेक्षाही उत्तम वातावरण असल्याचे छगण वडेकर हे द्राक्ष बागायतदार शेतकरी सांगतात तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही आपल्या आर्थिक संपन्नतेसाठी आणि उन्नतीसाठी द्राक्ष बाग लागवडीकडे वळावे असे आव्हान त्यांनी यावेळी शेतकरी बांधवांना केले आहे.