जनतेज न्युज

आमदार हरिभाऊ बागडे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला; माजी आमदार कल्याण काळे यांचा आरोप

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज सोमवार 21 मार्च रोजी सिडको परिसरातील एका हॉटेलच्या सभाग्रहात जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती, माजी विधानसभा परिषदेचे अध्यक्ष व औरंगाबाद जिल्ह्याचे भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आज रोजी काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरील आरोप केला आहे,

 कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यात

आमदार हरिभाऊ बागडे यांनी बाजार समितीची जागा परस्पर विकले असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आज रोजी पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे,

या संदर्भात अनेक मुद्द्यांवर ती माजी आमदार कल्याण काळे यांनी स्पष्टीकरण करीत माजी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या वरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून शंभर कोटी पेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी केल्याचा आरोप आज रोजी करण्यात आला आहे,

बाजार समितीची जागा विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्याचबरोबर देवगिरी सहकारी साखर कारखान्याची ही जागा त्यांनी विकली आहे,

पत्रकार परिषदेत विविध पुराव्यांची त्यांनी सदरील भ्रष्टाचाराचा आरोप केला असून,

भाजपाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी अधिवेशनात खोटी माहिती दिली असून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावी व आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत आज रोजी करण्यात आली आहे.