जनतेज न्युज

महाविकास आघाडी सरकारचा बॉस दाऊद , म्हणुन नवाब मलीकांचा राजीनामा नाही – आ नितेश राणे

प्रतिनिधी, उस्मानाबाद : भाजपाचे आमदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी आज आई तुळजाभवानीचे सहकुटूंब दर्शन घेतले यावेळी आ राणे यांनी महा विकास आघाडीसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर घाणाघाती टीका करत महा विकास आघाडीचा बॉस दाऊद इब्राहीम असुन नवाब मलीकांचा राजीनामा घेतल्यास उत्तर द्यावे लागेल म्हणुन राजीनामा घेतला जात नाही अशी टीका केली