जनतेज न्युज

सेक्रेड हार्ट शाळेकडून रस्त्यात बाधित होणाऱ्या सहा मोठ्या वृक्षांना दत्तक घेत केलं वृक्षांचं प्रत्यारोपण

प्रतिनिधी, कल्याण : कल्याण मुरबाड रोडचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रुंदीकरनाच्या कामात काही मोठी झाडं बाधित होत आहेत. मुरबाड रोड वर असलेल्या सेक्रेड हार्ट शाळेतर्फे या बाधित झाडांना वाचवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला. बाधित होणाऱ्या झाडामधील पाच झाडं दत्तक घेत ती मुळापासून काढून झाडांची वनविभागाच्या संरक्षित जागेत पुनरलागवड करण्यात आली आहे. शाळेच्या या उपक्रमाने नवीन आदर्श घालून दिला असून अन्य संस्थांनी देखील बाधित झाडांना वाचवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे.

कल्याण मुरबाड या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. या रस्त्याच्या  रुंदीकरणादरम्यान रस्त्यालगत असलेली काही झाडे बाधित होत आहेत . बाधित झाडे तोडून त्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात 5 झाडे वनविभागाच्या जागेत लावली जातात.  मात्र अनेक वर्षांपासून वाटसरूना सावली देणाऱ्या रस्त्यात बाधित होणाऱ्या  झाडांचा मात्र बळी घेतला जातो. शासनाकडून देखील कमीत कमी झाडे बाधित कशी होतील याबाबत प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच याच  झाडांना वाचवण्यासाठी कल्याण जवळ असलेल्या वरप गावातील सेक्रेड हार्ट शाळेने पुढाकार घेतला आहे. विकासाला विरोध न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार शाळा प्रशासनाने घेतला.

वनविभागाने देखील शाळा प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देत झाडांची पुनरलागवड करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे .झाड तुटणार आहे ती डोळ्याससमोर तूटताना पाहत बसण्यापेक्षा झाड कशी वाचवता येतील याबाबत सकारात्मक विचार करत तुटणार्या झाडांमधील काही झाडांचं प्रत्यारोपंन करण्याचा निर्णय घेतल्याचे शाळा प्रशासनाणे सांगितले .शाळा प्रशासनाने रस्ता रुंदीरकणाच्या कामात बाधित होणारी रायवळ आंबा, वड, करंज,  बदाम ही झाडे दत्तक घेतली असून तज्ञांच्या मदतीने या झाडानी पुनर लागवड करण्याचा निर्णय घेतला. आज 21 मार्च जागतिक वन दिनाच्या दिवशी हा उपक्रम सुरू करन्यात आला आहे. शास्त्रीय पद्धतीने आज बाधित झाडं मुळापासून काढून वरप येथील वनविभागाच्या जागेमध्ये  पुनर्लागवड करण्यात आली .या झाडांची  संपूर्ण देखभाल सेक्रेड हार्ट स्कूल करणार आहे. एकीकडे विकास हवा की पर्यावरण हा वाद अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे .मात्र शाळा प्रशासनाने हा उपक्रम राबवत विकास आणि पर्यावरण यात समतोल साधत नवीन आदर्श घालून दिला आहे .त्यामुळे बाधित झाड तोडण्यापेक्षा अशा प्रकारे या झाडांची पुनरलागवड करन्याच्या पर्यायाचा निसर्गप्रेमीकडून प्रयत्न झाल्यास या झाडांना वाचवणे शक्य होऊ शकणार आहे.