प्रतिनिधी , सांगितले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन काढण्यात आले आहे त्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी रविकांत तुपकर हेसुद्धा दाखल होत आहे.मात्र ज्या मतदारसंघात हा मेळावा आहे त्या मतदार संघाचे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी नाराज असताना त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल अशी चर्चा रंगत आहे मात्र या मेळाव्यामध्ये राजू शेट्टी व इतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून तो निर्णय घेतल्या जाईल असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सांगितलं तर येणाऱ्या पाच तारखेला कोल्हापुर ला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आम्ही महाविकासआघाडी मध्ये राहू की नाही याबाबत सुद्धा निर्णय घेऊ असेही रविकांत तुपकर यांनी सांगितले
