जनतेज न्युज

शिवसेनाचे प्रवक्ते विनायक राऊत यांनी आठ दिवसांत ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा मातोश्री वर मोर्चा काढु

प्रतिनिधी , औरंगाबाद : शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही” हे वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा ब्राह्मण समाज समन्वय समितीने केला तीव्र निषेध

काल औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार श्री. विनायक राऊत यांनी शेंडी जाणव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असे संतापजनक वक्तव्य करून समस्त ब्राह्मण समाजाचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केला आहे. शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या शिर्षस्थ नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नव्हे. याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसेच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे.
शेंडी-जानव्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही मग टोपी-बुरख्याचे हिंदुत्व शिवसेनेला मान्य आहे का ?
शेंडी जाणव्याचे हिंदुत्व मान्य नाही परंतु शेंडी जाणव्याचे मतदान शिवसेनेला मान्य आहे अशी दुटप्पी भूमिका कशी ??
हा वाक्प्रचार वापरायचा पायंडा पाडत आहात का ?..

वरील प्रश्नांची उत्तरे शिवसेनेने ब्राह्मण समाजाला देणे बंधनकारक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः संभाजी नगर शहरात एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ब्राह्मण समाज सदैव शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे. ब्राह्मण समाजाच्या अनेक अंगीकृत संघटना, ब्राह्मण समाजातील अनेक राजकीय नेते शिवसेना पक्षा मध्ये वर्षानुवर्षे सक्रिय कार्यरत आहेत परंतु यापुढे शिवसेना पक्षाला मतदान करताना ब्राह्मण समाजाला विचार करावा लागेल. असे पत्रकार परिषदेत माहिती दिली
ब्राह्मण समाजाचा वारंवार अपमान करून आपला नेमका कोणाला खूष करण्याचा हेतू आहे? हे स्पष्ट झाले पाहिजे.

सर्वप्रथम खासदार श्री. विनायक राऊत यांनी संपूर्ण ब्राह्मण समाजाची विनाविलंब जाहीर माफी मागावी अशी आमची प्राथमिक मागणी आहे अन्यथा ब्राह्मण समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल व येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाज सुज्ञ मतदार म्हणून शिवसेना पक्षावर पूर्णपणे बहिष्कार टाकेल आम्ही आठ दिवसांचा अवधी देतो जाहीर माफी मागितली नाही तर मातोश्रीवर मार्चा काढु असा इशारा आम्ही आज देऊ इच्छितो.