जनतेज न्युज

भगतसींग ब्लड डोनर गृप, विर भगतसींग विद्यार्थी परिषद, जिजाऊ बुक बँक तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहीद दिन साजरा

प्रतिनिधी : वर्धा : २३ मार्च रोजी दरवर्षी शहीद दिवस साजरा केला जातो. भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. भारतमातेच्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी आज वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहिद भगतसींग ब्लड डोनर गृप, विर भगतसींग विद्यार्थी परिषद, जिजाऊ बुक बँक तसेच संभाजी ब्रिगेडतीच्या वतीने मौन पाळून व त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून वंदे मातरम भारत माता की जय इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत शहीद दिन साजरा करण्यात आला.

व्हॉईस- २३ मार्च रोजी इंग्रजांनी भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती. त्यांच्या या बलीदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. या शहीद दिनानिमित्त यावेळी शहिद भगतसींग ब्लड डोनर गृपचे सदस्य, विर भगतसींग विद्यार्थी परिषद सदस्य, जिजाऊ बुक बँक कार्यकर्ते व व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.