प्रतिनिधी, जळगाव : धुळे जिल्ह्यातील साक्री येथे मुस्लिम समाजाच्या वतीने भोई समाजा नागरीका वरती धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे भोई समाज बांधवांच्या वतीने वरणगाव पोलीस स्टेशनच्या समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. रंगपंचमी दिवशी भोई समाजातील नागरिक साक्री भोई गल्ली मध्ये रंगपंचमी खेळत असताना मुस्लिम समाजातील एका गटाने येऊन ही भोई समाजाच्या नागरिकावरती धारदार शस्त्राने हल्ला केला त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भोई समाज बांधवांनी वरणगाव पोलिस स्टेशन समोर निदर्शने करत भोई समाजाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे
