जनतेज न्युज

विकासाला घाबरूनच केजरीवाल यांच्या घरावर हल्ला – कल्याणात भाजप खासदार तेजश्री सूर्या प्रतिमेला चपलेचा हार घालत जोडा मार आंदोलन

प्रतिनिधी, कल्याण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आज आम आदमी पार्टीचे कल्याण शहराध्यक्ष धनजय जोगदंड याच्यासह कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेत  जोडा मार आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. यावेळी खासदार तेजश्री सूर्या यांच्या प्रतिमेला चपलेचा हार घातला तर महिला कार्यकर्त्यांनी त्याच्या प्रतिमेला चपलेने झोडपले. दरम्यान यानंतर बोलताना जोगदंड यांनी केजरीवाल यांनी दिल्लीत गरीब जनतेसाठी मोफत शिक्षण, आरोग्य आणि वीज सेवा उपलब्ध करून दिली असून पंजाब मध्ये देखील भाजपाने सपाटून मार खल्ला आहे. यामुळेच मोदी सरकार बिथरले असून यातूनच भाजपाने हा भ्याड हल्ला केल्याचे सांगत भाजप केजरीवाल यांचा विकासाचा वारू रोखू शकत नसल्यामुळेच त्यांना संपविण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप केला. त्याच बरोबर राज्याचा मुख्यमंत्री सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित राहील असा सवाल करत या गुंडांना गृहमंत्री अमित शहा यांनी कारागृहात डांबले पाहिजे अशी मागणी केली.