प्रतिनिधी, नागपुर : अंग भाजून काढणाऱ्या उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत.आणखी किमान तीन ते चार दिवस ही लाट कायम राहणार असून पुढील काही दिवस तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ होत जाईल, असा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. दरवर्षी साधारणत: एप्रिलमध्ये विदर्भात उन्हाळा सुरू होतो. तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसवर जाते. पण, यावर्षी मार्चच्या पंधरवड्यापासूनच तापमानात वाढ नोंदवण्यात आली. उष्णतेच्या लाटेमुळे सकाळी ९ वाजतापासूनच कडक ऊन राहते. कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये,पाणी भरपूर प्यावे अशा सूचना महापालिकेने केल्या आहे. गमछा, टोपी, गॉगल, हातमोजे घालूनच लोक बाहेर पडत आहेत. बुधवारी नागपूर ४२.१, अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.
