प्रतिनिधी, अकोला : अकोला शहरात आज हिमोफेलिया दिवस साजरा करण्यात आला आहे. अकोला शहरातील रेड क्रॉस सोसायटी येथे हिमोफिलिया सोसायटी अकोला चॅप्टर सोसायटी कडून हिमोफेलिया दिवस हा रुग्णाण सोबत हा दिवस आनंदाने साजरा करण्यात आला असून यावेळी हिमोफेलिया दिवसाला मोठ्या प्रमाणात रुग्ण उपस्थित होते. यावेळी त्याचबरोबर रेड क्रॉस सोसायटीचे चेयरमन डॉ किशोर मालोकार, डॉ.पार्थसारथी शुक्ल,डॉ शामकुमार सिरसाम,ऍड महेंद्र साहू,हे उपस्तीत होते यावेळी उपस्थित हिमोफेलिया आजार काय असतो आणि याचा परिवारातील आईला काय त्रास सहन करावा लागतो हे सांगत असताना रुग्णाच्या आईचे डोळे पाणावले होते.
