प्रथिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यासह परिसरात भुईमुंग काढणीला सुरुवात झालेली आहे. मार्केटमध्ये भुईमुंग च्या शेंगांना ओली शेंग पाच हजार रुपये क्विंटल तर, कोरडी सेंग सहा हजार रुपये क्विंटल भावाने विकली जात आहे. परंतु यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्या कारणाने शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड कमी प्रमाणात केली त्यामुळे यावर्षी शेंगदाण्याचे भाव सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. चोपडा तालुक्यात ज्या शेतकऱ्यांनी शेतात भुईमूंग ची लागवड केलेली आहे त्या शेतातील भुईमूग काढणीस आली आहे परंतु मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यासाठी आदिवासी भागातील आदिवासी मजुरांना पाल्याच्या बदल्यात भुईमूग काढण्यास दिले जात आहे यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. भुईमुगाचा पाला पंधरा हजार रुपये ट्रॅक्टरचा टाँलीने विकला जात असतो आणि मजुराच्या साह्याने जर भुईमुंग काढले तर दहा हजार रुपये मजुरी मध्ये काढला गेला असता. परंतु, पालाच्या बदल्यात भुईमुग काढल्याने 20000 रुपये घाटा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे खर्च जवळपास 40 हजार रुपये लागला असून खर्च वजा वीस हजार रुपये उत्पन्न हातात येणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे, तर काही शेतामध्ये मजूर मिळत नसल्याने शेतातच भुईमुगाचे पीक जळू लागले आहेत.
