प्रतिनिधी, पुणे : संगमनेर तालुक्याच्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हल बसणे अचानक पेट घेतला. शिर्डी वरुन संगमनेर मार्गे भीमाशंकरला दहा प्रवासी घेऊन चाललेल्या बसने अचानक गरम होऊन पेट घतला चालकाच्या प्रसंग अवधानाने लेगेचच त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली व प्रवाश्यांना बस मधून खाली उतरण्याची सुचना केली त्याच दरम्यान बसने अचानक पेट घेतला.
थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले.केवळ दैव बलवत्तर असल्याने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ह्या घटनेमुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
