प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेनेचे शिव-संपर्क अभियान सुरू आहे . या अभियानाअंतर्गत कल्याण डोंबिवली मध्ये विविध ठिकाणी कार्यकर्ता साठी मेळावे आयोजित करण्यात येत आहे .कल्याण पूर्वेतील एका मेळाव्यात शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे .आपल्या मार्गदर्शन पर केलेल्या भाषणात अल्ताफ शेख यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना निजामशाह आणि अफजल खानाच्या उपमा दिली तर आदिलशाही संपवली मोगलशाही आणि निजामशाही संपवली आता दिल्लीच्या तक्तावर नवीन अमित शाही नावाची औलाद आली आहे आणि या शाहीणे फतवा काढला आहे महाराष्ट्रात जा आणि शिवसेना संपवा आणि महाराष्ट्र संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस नावाच्या खानाने उचलला आहे याच खानाचा कोथळा आपल्याला बाहेर काढायचा आहे अस म्हणत भाजपावर टीका केली आहे.
