प्रथिनिधी, बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथे शेतीच्या वादातून 31 मेच्या सकाळी दोन परिवारात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली यात 5 जण जखमी असून मारहाणी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात काल रात्री उशीरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जिल्ह्यातील देऊळघाट येथील रामराव पारवे कुटुंबीय व गावातीलच कलंदर कुटुंबियात अनेक दिवसांपासून शेतीबद्दल वाद सुरू आहे. 31 मे रोजी कलंदर कुटुंबीयांनी या वादातून पारवे कुटुंबियांवर हल्ला करून पारवे कुटुंबियातील सदस्यांना जबरदस्त मारहाण केली, या मारहाणीत महिलांना , मुलींना सुद्धा सोडण्यात आलं नाही , ही फ्री स्टाइल बराच वेळ चालली होती. सदर घटनेच्या चित्रीकरणा वरून ही मारहाण कशा प्रकारे करण्यात आली असेल हे नव्याने सांगायला नको. सदर घटनेची तक्रार दोन्ही पक्षांच्या वतीने बुलढाणा ग्रामीण पोलिसात केली असून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा, विनयभंग व दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या मारहाणीत पारवे कुटुंबातील दोन महिला व एक पुरुष असे तिघे जण तर कलंदर कुटुंबातील 2 जण असे एकूण 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
