जनतेज न्युज

मोबाईल चोरल्याच्या संशयावरून २६ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह झुडपात टाकणाऱ्या चार आरोपीना कळवा पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

प्रथिनिधी, ठाणे :

टक आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कळव्याच्या भास्करनगर, कळवा पुर्वकडे जाणाऱ्या कच्या रोडच्या उजव्या बाजुच्या झुडपामध्ये एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आढळला. कळवा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. जखमीला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हत्येचा कुठलाही पुरावा नसल्याने कळवा पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार करण्यात आला. या पथकाने मृतकाची ओळख पटवली. फरिद वजिद शेख असे या २६ वर्षीय मृतक तरुणाचे नाव असून तो कळव्यातील सम्राट अशोकनगर येथील राहणार असल्याचे समोर आले. कळवा पोलिसांनी कुठलेही पुरावे नसताना गुप्त माहितीदारांच्या मदतीने चार जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता या चारही जणांनी गुन्हा कबुल केला. आबिद इसफाक शेख २५, सोहेल मोहमद लतीफ शेख १९ अल्लाउद्दीन नजरूल शेख १९, सरफरोश सिराज अन्सारी २१ अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना फरिद वजिद शेख याने आपला मोबाईल चोरी केला असल्याचा संशय आला या संशयातून आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. चारही आरोपींची फरीद याला ठोशाबुक्यांनी, लाकडी बाबु, पटयाने जबर मारहाण केल्याने फरीद याचा मृत्यू झाला. नंतर मृतदेह हा झुडपात फेकण्यात आला. या प्रकरणाची अधिक चौकशी कळवा पोलीस करत असल्याचे माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी दिली .