प्रथिनिधी, कल्याण :
प्रसूती साठी आलेल्या महिलेच्या बाळाचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याण मधील खाजगी रुग्णालयात घडली .प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेवर उपस्थित नव्हते , डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे बाळ दगावल्याच्या गंभीर आरोप महिलेने केला आहे .तर याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी मात्र आरोपांच खंडन केलंय.ही घटना दुर्दैवी होती बाळाला वाचवू शकलो नाही याचं आम्हाला दुःख आहे , मात्र आम्ही योग्य पद्धतीने उपचार केले, उपचाराबाबत सातत्याने त्यांच्या कुटुंबाला माहिती दिली जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं. कल्याण पश्चिमेतील अशोकनगर वालधूनी परिसरात राहणार्या जयश्री विशाल जपताप हा नऊ नहिच्या गर्भवती होत्या. त्यांचे पती लॉड्रीत काम करतात .जयश्री यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कल्याण पश्चिम पारनाका परीसरातील ॲपेक्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले. मात्र दुपारच्या सुमारास प्रसूती दरम्यान बाळ दगावले .बाळाच्या आई जयश्री यांनी डॉक्टरांनी वेळेच उपचार न केल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय . जयश्री यांनी सकाळी सात वाजल्यापासून प्रसूतीच्या वेदना होत असल्याने डॉक्टर आल्या. त्यांनी कळा बंद होण्याचे इंजेक्शन दिले त्या गेल्यावर ठाण्याहून भूलतज्ञ आल्या. त्यांना वेळ नसल्याने त्याही निघून गेल्या. आधी सिझेरियन करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर पुन्हा सोनोग्राफी करुन माझी नॉर्मल डिलीव्हरी केली. पण जन्माला आलेले बाळ मृत असल्याचे सांगत डॉकटर चया निष्काळजपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप केला .
तर ॲपेक्स रूग्णालयातील डॉकटर मानसी घोसाळकर यांनी मात्र या आरोपांच खंडन केलं यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संबंधित महिला ही आठ महिन्याची गरोदर होती. तिला कळा सुरु झाल्या तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरु केले. बाळाच्या वारेत रक्तस्त्रव सुरु झाल्याने बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते. तिच्यावर सुरु असलेल्या उपचाराची सर्व कल्पना तिच्या नातेवाईकांसह तिच्या पतीला दिली गेली होती. ही घटना अत्यंत दुदैवी आहे उपचार करुन देखील बाळाला वाचवू शकलो नाही. बाळाला अॅक्सीडेंटल हॅब्रेज झाल्याने बाळ जन्माला आल्यावर त्याला पुन्हा काचपेटी लागू नये याकरीता तिची प्रसूती सिजेरियन ऐवजी नॉर्मल करण्यात आली. त्यामुळे रुग्ण महिलेचा आरोप चुकीचा असल्याचे सांगितले .
