जनतेज न्युज

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅली

प्रथिनिधी, बुलडाणा : आजादी का अमृत महोत्सवी वर्षाच भाग म्हणून आज 3 जून जागतिक सायकल दिनानिमीत्य सायकल रॅलीचे आयोजन नेहरू युवा केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. बुलडाणा शहरातील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल च्या मैदानावर सकाळी 7.30 वाजता या रँलीला आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी राममुर्ती ,सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड उपस्थितीत होत्या.. 13 देशात सायकलव्दारे भ्रमंती करणारे आंतरराष्ट्रीय सायकलपटू संजय मयुरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तरी या सायकल रॅलीमध्ये आमदार संजय गायकवाड आंतरराष्ट्रीय सायकल खेळाडू संजय मयुरे यांच्यासह लहानांपासून तर थोरांपर्यंत सायकल स्पर्धा विद्यार्थी व खेळाडू सहभागी झाले होते.