जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्ताने शहरात घेणार विविध कार्यक्रम

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार 9 जून रोजी औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याच अनुषंगाने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी जिल्ह्यात होणारे विविध सामाजिक उपक्रम आसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहरात विविध विकासाची कामे या निमित्ताने करण्यात येणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील विकासात भर पाडण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे,सदरील पत्रकार परिषद आज रोजी हाडको परिसरातील राष्ट्रवादी भवन येथे सदरील पत्रकार परिषद संपन्न झाली आहे.सदरील पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून यासाठी व्यसनमुक्तीचे ही कार्यक्रम घेण्यात येणार आहे विविध रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, वृक्षरोपण याचेही मोठे कार्यक्रम शहरात घेणारे येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली आहे.