प्रतिनिधी, मुंबई : अणुशक्ती नगरमध्ये भारत नगर, हसीना नगर हा झोपडपट्टीचा विभाग आहे व तो उंच डोंगराळ भागात आहे. तेथील रहिवाश्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लोकांना पिण्याचे पाणी आलेले नाही. या समस्येची अनेक वेळा मुंबई महापालिकेमध्ये लेखी तक्रार केली पण अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसून पाण्याची समस्या जशीच्या तशी आहे. या आंदोलनात स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकांना पिण्यासाठी रोज नळाचे पाणी मिळावे याकरिता आम आदमी पार्टीच्या वतीने मुंबई महानगर पालिका एम पूर्व वार्डमध्ये हंडा घेऊन आंदोलन करण्यात आला.
