प्रतिनिधी, औरंगाबाद : आज रविवार 12 जून रोजी माहिती देण्यात आली की औरंगाबाद जिल्ह्यातील वसई जळकी परिसरात भरत पावसामध्ये दुचाकीने पेट घेतल्याची घटना आज रोजी घडली आहे,
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, वसई जळकी येथे वायर टच होऊन अचानक चालत्या गाडीला आग लागली सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही.
ऋषिकेश हिवाळे. रा.सपकाळ जळगाव ता. भोकरदन हे वसई वाडी येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येत असता वसई वाडी जवळच वायर टच होऊन अचानक गाडीला आग लागली,
त्यांनी वेळीच गाडी थांबून पावसाच्या पडलेल्या पाण्याने गाडी विझवण्याचा प्रयत्न केला यामध्ये गाडीला आग लागून मोठ्या प्रमाणात दुचाकीचे नुकसान झाले आहे,
अशी माहिती दुचाकीचालक यांनी सदरील माहिती आज रोजी दिली आहे सदर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
