जनतेज न्युज

परीक्षा देण्यास आलेल्या विद्यार्थ्याला चोरट्यांनी लुटले; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यातील परळी शहरात परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील गणेश घानोकार हा विद्यार्थी परळीत एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात परीक्षा देण्याकरिता आला. यावेळी रात्री अंधार असल्याने पहाटे चार वाजेपर्यंत त्याने रेल्वे स्थानकावर वेळ घालवला. त्यानंतर राहत असलेल्या ठिकाणी जात असताना रस्त्यावरच त्याला चोरट्यांनी लुटले. यावेळी जवळील सातशे रुपये आणि मोबाईल काढून चोरट्यांनी एटीएम मधून जबरदस्तीने सर्व रक्कम काढून घेतली. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून विद्यार्थ्यांच्या तक्रारी नंतर संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.