जनतेज न्युज

हिंदूंवर होणाऱ्या भ्याड हल्यांच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद उतरले रस्त्यावर

प्रतिनिधी, ठाणे : गेले अनेक दिवस हिंदू मुस्लिम वाद चव्हाट्यावर आला असताना आता हिंदूंवर होणाऱ्या भ्याड हल्यांच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरले असून ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल च्या माध्यमातून घोषणा बाजी करत निदर्शने करण्यात आली. हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर कोणीही कारवाही करत नाही आणि हिंदूंनी काही बोलला तर मोठं मोठ्या कारवाया होतात असं आरोप यावेळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी गहिंदूंच्या समर्थनार्थ पत्र राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. हिंदूवरचे भ्याड हल्ले थांबले नाहीत, तर देशभरात निदर्शने करू, असा इशारा देखील दोन्ही संघटनेनकडून देण्यात आला.