जनतेज न्युज

कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
या कारवाई अंतर्गत कळवा प्रभाग समिती येथील शंकर मंदिर शेजारी, कळवा येथे स्लॅब कापून तोडण्यात आला. कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे स्लॅब, शास्त्रीनगर, कळवा येथील बांधकामाचे स्लॅब व कॉलम तोडण्यात आले. तसेच टाकोळी मोहल्ला, कळवा येथील बांधकामाचे स्लॅब व अंतर्गत बांधकाम ३० लेबर, २ ब्रेकर व १ गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले.
सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.