जनतेज न्युज

संत लोटांगण महाराज, ज्ञानराज माउलीच्या दिंडीचे आज प्रस्थान पंढरपुरला पायदळ दिंड्या आज रवाना ; टाळ मृदुंगाच्या गजरात वारी निघाली पंढरपूर भक्त्याच्या हर्ष उल्हासात निघाली वारी

प्रतिनिधी , वर्धा : दोन वर्षापासून कोणतेही सन उत्सव तसेच आषाढी पायदळ वारी सुध्दा निघाली नाही. आज दोन वर्षांनंतर वर्ध्यातील श्री संत लोटांगण महाराज पायदळ दिंडी  आर्वी नाका येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून शनिवारला सकाळी निघाली असून यावेळी भक्त्याच्या चेहऱ्यावर त्याचा विठू बघण्यासाठी एक वेगळाच हर्ष उल्हास दिसून आला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या जयघोषात दिंडीचे प्रस्थान झाले. श्री संत लोटांगण महाराज प्रासादिक दिंडीचे प्रेरनास्थान वैकुठवासी हभप सीताराम सावनेरकर महाराज होते. त्यांच्या प्रेरणेने या पायदळ वारीचे सातत्य काम असून, २२ वर्षांची परंपरा नित्यनेमाने आजही सुरू आहे. या संस्थेचे अध्यक्ष हभप रामदासबापू पवार आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही परंपरा जोपासत आहे.