प्रतिनिधी, वाशीम : केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी ‘अग्निपथ’योजनेची घोषणा केल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन करत आहेत.लष्करात भरती होऊ इच्छिणारे तरुण या योजने विरोधात संताप व्यक्त करत आहेत.वाशिम मध्ये ही या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाअक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.या दरम्यान सर्व संघटना व तसेच राजकिय पक्षाने पाठिबा जाहीर केला होता त्यानुसार आज जिल्हा क्रीडा संकुल येथून मोर्चाला सुरुवात झाली असून,जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणा देत निषेध नोंदवला.
