जनतेज न्युज

पोलिसांना चकमा देत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चौघांना 18 लाखांचा सोन्यासह पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी, धुळे : मुंबईहून मंगलोर येथे जाणाऱ्या एका बसमधून तब्बल 18 लाखांचे सोन्याचे दागिने लुटून धुळे मार्ग मध्यप्रदेश मध्ये पसार होत असलेल्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळक्याला कर्नाटक पोलीस आणि धुळे पोलिसांच्या मदतीने सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सोनगीर टोल नाक्यावर सापळा रचून फिल्मी स्टाइल पद्धतीने कर्नाटक पोलिस व धुळे पोलिसांनी अटक केली आहे.

सदरच्या गुन्ह्यासंदर्भात आज पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली यावेळी त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, 16 जून रोजी मुंबईहून मंगलोर येथे जाणाऱ्या एका खाजगी बसमधून 18 लाखांचे सोन्याचे दागिने लूट करण्यात आल्याची तक्रार कर्नाटक राज्यातील बाईंदुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. बाईंदुर पोलीस स्टेशन, कर्नाटक येथे 19/22 भा. दं. वि कलम 329 प्रमाणे दाखल आहे. कर्नाटक पोलीसांची टीम गाडीच्या मागावर होती. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, मारुती कार MP 09 W 9284 या वाहनातून कर्नाटक राज्यातील सोने चोरी प्रकरणातील टोळी धुळे मार्गे मध्यप्रदेश येथे जात आहे, त्यातच कर्नाटक पोलिसांचे पथक देखील त्यांचा तपास करीत धुळ्यात आले आहे. या सर्व घटनेची माहिती घेऊन धुळे पोलीस, सोनगीर पोलिस व कर्नाटक पोलिसांच्या पथकांनी सोनगीर टोल नाका येथे सापळा रचून काल रात्री बारा वाजेच्या सुमारास सदर कार मधील आरोपींना टोलनाक्यावर येताच त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी गाडी अंगावर घालत होते आणि अतिशय अट्टल असे ते चोर होते. यावेळी कर्नाटक पोलिस व धुळे पोलीस यांनी सोनगिरी पोलिसांच्या तसेच एनसीबीचे पथकाच्या मदतीने फिल्मी स्टाईल ने सदर अट्टल गुन्हेगारांच्या वाहनावर झडप टाकून सदर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या झटापटीत कर्नाटक येथील दोघ पोलिस कर्मचारी जखमी झाले, मात्र कर्नाटक पोलिस व धुळे पोलिसांच्या मदतीने अट्टल गुन्हेगारांना अखेर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

यानंतर धुळे एलसीबी कार्यालयात आणून अट्टल गुन्हेगारांची विचारपूस केली असता त्यांनी कर्नाटक राज्यात चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्या गाडीमधून 18 लाखांचे सोने पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना धुळे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.