प्रतिनिधी, औरंगाबाद : आज सोमवार 20 जून रोजी औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा लेबर युनियन संघटनेने माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन करण्यात आले आहे. माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आले असून जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांचे मे २०२२ चे पगार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याच बरोबर मंडळाला पगार न भरणाऱ्या कंत्राटदाराचे कर रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी मराठवाडा लेबर युनियन यांचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सदरील युनियनचे साथी सुभाष लोमटे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महामंडळ यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन संपन्न झाले.
