जनतेज न्युज

ट्रकांची हेराफेरी करणारा मास्टरमाईंड धुळे पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी, धुळे : ट्रकचे चेचीस व इंजिन नंबर बदलून हेराफेरी होत असल्याचा भांडाफोड धुळे पोलिसांनी या आधी केला होता. यासंदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन तब्बल 30 ट्रक देखील हस्तगत केले आहेत. या हेराफेरी प्रकरणी मागील मुख्य मास्टरमाइंड अद्याप फरार असल्याने धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा तपास करीत होते. या प्रकरणी मुख्य मास्टरमाईंड याला थेट नागपुरातून अटक करण्यात आली आहे.

या मास्टरमाईंडची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी थेट नागपुरात धडक दिल्याने तेथे हा मुख्य मास्टरमाईंड पोलिसांना ट्रकांची हेरा फेरी करीत असतानाच रंगेहात सापडला. नागपूरहून थेट सदर आरोपी ला आणून त्याची विचारपूस केली असता त्याने हे काम केले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शिवाय त्याच्या जवळून या संदर्भातले काही महत्वाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

या संपूर्ण कारवाई संदर्भात पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले की,  ट्रक हेराफेरी प्रकरणी समांतर तपास धुळे एलसीबी चे पीआय हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की ट्रकचे चेचीस व इंजिन नंबर हेराफेरी चे काम करणारी गॅंग आपण ताब्यात घेतलेली आहे. या सर्व संशयितांवर एक इसम युनुस राहणार अमरावती त्याच्याकडच्या साहित्याने चेचीस व इंजिन नंबर बदलण्य़ाचे काम केल्याची माहिती मिळाली होती. धुळे एलसीबी ने या माहितीच्या आधारे युनूस खानच्या शोधात अमरावती गाठली. मात्र, अमरावतीत गेल्या असताना संशयीत युनिस खान हा नागपूरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर धुळे एलसीबी ने लागलीच नागपूर येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी पोहोचले. या ठिकाणी युनूस खान एका कँटेनेर वर चेचीस नंबर पंच करीत होता. त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने युनूस खान सांगितले तो वेल्डिंग व्यवसाय करतो आणि महाराष्ट्रातील अमरावती येथे राहत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी लागलीच त्याला त्याच्या सर्व हेराफेरीच्या साहित्यासह ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलिसांनी युनिस खानच्या जवळून 22 हजाराची साहित्य आणि 58 लाख रुपये किमतीचे तीन ट्रक जप्त केले आहेत. या प्रकरणात अजून कोण कोणाचे हात आहे व ती कुठे कुठे आहे याचा शोध आता धुळे पोलीस करीत आहेत.