जनतेज न्युज

अग्निपथ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात मोठा पोलिस बंदोबस्त.

प्रतिनिधी, जालना : देशासह विविध राज्यात सुरू असलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रमाणात रेल्वे च्या मालमत्तेची हानी केल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात आज पासून कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात अग्निशमन विभागाचा बंब, रेल्वे पोलिस त्याच बरोबर शहर पोलिसांची एक तुकडी ही या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात कुठलाच अनुचित प्रकार अथवा रेल्वे च्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये  म्हणून या ठिकाणी हा बंदोबस्त लावण्यात आला आहे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे आदेश ही पोलिसांना देण्यात आले आहे. रेल्वे ही सार्वजनिक माल मालमत्ता असल्याने त्याचे कुठल्याच प्रकारचे  नुकसान होता कामा नये म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती स्थानक प्रमुख कृष्णकांत प्रसाद यांनी दिली.