जनतेज न्युज

दोन एटीएम फोडून 27 लाखांची चोरी.

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक परिसरात बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम फोडून 27 लाख रुपये घेऊन  चोरटे पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या  माहितीनुसार दोन चोरटे पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास एटीएम मध्ये शोरूम एक एटीएम ग्यास  कटरच्या साह्याने व दुसरा एटीएम खोलून चोरीच्या 27 लाख रुपये चोरून नेले पहाटे या एटीएम च्या शेजारी असलेल्या दुकानदारांनी एटीएम गाळा  मालकांना माहिती दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला सध्या कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही च्या आधारे पोलिस पुढील तपास करीत आहे .या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.