प्रतिनिधी, धुळे शहराचे आमदार डॉ फारुख शाह यांचे काल रात्री अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच फोन करुन जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे म्हणत आज एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेऊन झालेल्या गंभीर प्रकार त्यांना सांगितला व आमदार डॉ फारुख शाह यांना अतिरिक्त पोलिस सुरक्षा द्या अशी मागणी देखील करण्यात आली.यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्या डॉ. दीपा नाईक यांनी बोलताना सांगितले की धुळे शहराचे आमदार यांच्यावर यापूर्वी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता तसेच त्यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आलीआहे यापूर्वी आम्ही पोलीस विभागाला देखील वेळोवेळी सूचित केले आहे असे असताना काल रात्री पुन्हा आमदार फारुख शहा यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या गंभीर गोष्टीची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तत्काळ आमदार फारुक शाह यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांच्या घराजवळ अतिरिक्त पोलिस पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा तसेच रात्रीच्या वेळी त्यांच्या सुरक्षेत अतिरेक पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. अशा अनेक मागण्या घेऊन आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
