जनतेज न्युज

बंडखोर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या घराबाहेर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त

प्रतिनिधी, बुलडाणा : राज्यातील शिवसेना आमदारांच्या बंडखोरी नंतर शिवसैनिकांमध्ये पसरलेला रोष पाहता बंडखोर आमदारांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  शिवसेना नेते बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या बंडखोर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या बुलडाण्यातील निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिवसेना बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडण्यात आल्यानंतर तसेच मुंबईतील अनेक आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले झाले त्यामुळेच आता आमदारांच्या निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.