जनतेज न्युज

सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बेटी बचाओ-बेटी पढाओ सक्षमीकरण सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलडाणा डाक विभाग मार्फत 27 जून ते 29 जून 2022 या कालावधीत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेतंर्गत बेटी बचाओ-बेटी पढाओ सक्षमीकरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 10 वर्षाखालील सर्व मुली भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढण्यासाठी पात्र आहेत.  या योजनेनुसार कमीत कमी 250 रूपये भरून आपण खाते उघडू शकता, 10 वर्षाखालील सर्व मुलींचे आई / वडील, पालक हे खाते उघडू शकतात. एका कुटूंबात केवळ 2 मुलींच्या नावे हे खाते उघडल्या जाते. यासंदर्भात जनजागृती करत बुलढाणा शहरामध्ये एसबीआय चौक जयस्तंभ चौक बाजार लाईन येथे रॅली काढण्यात आली आहे. यार आली मध्ये पोस्ट ऑफिसचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.