जनतेज न्युज

आमच्या विठुराया सोबत, मथळ्याखाली बॅनरबाजी ; आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनात लागले बॅनर

प्रतिनिधी, बुलडाणा : शिवसेने तील एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी बंड पुकारले असून, संपूर्ण राज्यभरात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या समर्थात आणि विरोधात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे..त्यातच आता शिंदे गटात असलेल्या आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थानात त्यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहे. बुलडाणा शहरातील संगम चौकात, “आम्ही संजुभाऊ समर्थक” आणि “आम्ही आमच्या विठुराया सोबत” अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. हे बुलडाणा जिल्ह्यातील समर्थानात पाहिले बॅनर असून विशेष म्हणजे या बॅनर वर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे.