प्रतिनिधी, अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे ग्रामपंचायत कर्मचाय्रांना सामान काम समान वेतन कायदा ग्रामपंचायत कर्मच्याय्रांना लागु करा अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचारी युनियन अध्यक्ष विलास दिघे यांनी केली आहे. बोटा गटातील शेकडो ग्रामपंचायत कर्मच्यारी यावेळी हजर होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघटनेचे अध्यक्ष विलास दिघे, जिल्हा कार्यकारी सचिव बाळासाहेब शिंदे,सहसचिव विलास तांबे व सचिव बाळासाहेब सांगळे संघटनेचे बबन सांगडे, हे देखील यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद वाकळे यांनी केले तर या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते नीतीन आहेर, अशोक सूर्यवंशी, विलास माने, तुषार लेंडे, पांडुरंग मोरे, दिपक मोरे व इतर कर्मचारी उपस्थित होते
