जनतेज न्युज

वरवंड येथून कृषी संजीवनी योजनेचा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिनिधी, बुलडाणा : कृषी संजीवनी मोहीम 2022 – 23 चा शुभारंभ जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते करण्यात आला. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त मौजे वरवंड  येथे कृषी तंत्रज्ञान प्रसार व मूल्य साखळी बळकटीकरण दिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली.. रुंद वरंबा व सरी पद्धतीने सोयाबीन पिकाचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांच्या समक्ष घेण्यात आले. तसेच टोकन पद्धतीने सोयाबीन ची पेरणी चे प्रात्यक्षिक सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याहस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी सोयाबीन पिकाचे लागवड तंत्रज्ञान, रुंद वरंबा व सरी पद्धत, टोकण पद्धतीने पेरणी,खत व्यवस्थापन, उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, तण व्यवस्थापन आदी बाबीवर तसेच सोयाबीन उत्पादकता वाढ मूल्य साखळी योजनेबद्दल मार्गदर्शन केले.