प्रतिनिधी, बुलढाणा : उनाड नाल्याची साफसफाईचे निवेदन देऊन हि जेमतेम एक महिना होत आला आहे तरीही नगर परिषद द्वारे कोणतीही हालचाल दिसून येत नाही. नगर परिषदेला नागरिकांच्या घरात पाणी गेल्यावर जाग येईल का असे उमेश सुरेश राजगुरे भाजपा शेगाव शहर प्रसिद्धी म्हणून यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. उनाड नाल्याची साफसफाई न झाल्याने रात्री शेगांव शहर जोरदार पाऊस पडल्याने उनाड नाल्याला पूर आला आणि नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे भोईपुरा येथे नागरिकांच्या घरामध्ये उनाड नाल्याला आलेल्या पुरामुळे सल्फेटचे खत ,सोयाबीनच्या बॅगा, तुरीचे कट्टे, इलेक्ट्रिकचे सामान लायटिंग लाऊड स्पीकर ,अन्नधान्याची नासाडी गव्हाचे कट्टे कांद्याचे कट्टे इत्यादी साहित्यांचे नुकसान झाले आहे. नाल्याच्या पुराचे पाणी घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
