जनतेज न्युज

महाड भोर मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली

प्रतिनिधी, रायगड : महाड भोर मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने एक जण जखमी झाला आहे. ही दरड लहान स्वरूपात असल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी मध्ये या घाटात 30 हून अधिक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. पण यावर्षी पुन्हा दुरुस्त केला गेले दोन दिवसांपासून महाडमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने आज सकाळी वरंधा घाटात वाघजाई मंदिराजवळ डोंगरातून ओसरा खाली आल्याने मंदिराजवळ खाद्यपदार्थ विकणारे अरुण पवार हे जखमी झाले आहेत.या घाटामध्ये महामार्ग विभागाकडून ठेवण्यात आलेल्या जेसीबी द्वारे दरड त्वरित काढण्यात आले परंतु अरुण पवार यातून बचावल्याने जखमीला पुढील उपचारासाठी महाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दरड रस्त्याच्या एकाच बाजूला कोसळल्याने घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.