प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने जीवदान दिले असून देवळा तालुक्यातील भीलवाडा येथे बाळासाहेब जाधव यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे लक्षात येताच या शेतकऱ्याने वन विभागाला माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद करत विहिरीच्या बाहेर काढून त्याला वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या आदिवासी सोडून देण्यात आले.
