प्रतिनिधी, रत्नागिरी : कोकणातील कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या आमदार राजन साळवी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार साळवी यांच्या कार्यालयात शिवसैनिकांकडून साळवी यांचं जंगी स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या . दरम्यान रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि यापुढेही बालेकिल्लाच राहिल असा विश्वास व्यक्त करत उपनेते पदाचा सोनेरी मुकुट शिवसेनेसह सच्च्या शिवसैनिकांमुळेच मला मिळाला आहे. हा सन्मान केवळ माझा नसून जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकांचा असल्याचा विश्वास नूतन उपनेते तथा आमदार राजन साळवी यांनी यावेळी व्यक्त केला.
