जनतेज न्युज

धुळे शहरातील नागरिकांचा पुन्हा पाण्यासाठी संघर्ष ;महानगरपालिकेवर काढला हंडा मोर्चा

प्रतिनिधी, धुळे : धुळे शहरातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही दहा ते पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालेला नसल्यामुळे आज धुळे शहरातील वार्ड क्रमांक 12 मुस्लिम नगर परिसरातील संतप्त नागरिकांनी तसेच समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी याबाबत थेट धुळे महानगर पालिकेवरच हांडा मोर्चा नेला. गेल्या वर्षभरापासून धुळे शहरातील नागरिकांना प्राणी प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. धुळे महानगरपालिकेकडून रोज नवे आश्वासन देण्यात येतात मात्र त्याची पूर्तता होताना दिसत नाहीये. धुळे शहरातील अनेक भागांना आठ दिवसाआड तक काही भागांना पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे त्यातही स्वच्छ पाणी मिळत नाही त्यामुळे धुळे शहरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले आहे. धुळे शहरातील वार्ड क्रमांक 12 मुस्लिम नगरपरिषद पिण्याच्या पाण्याचा पुरवठासाठी 15 ते 20 दिवस दिवस उशीर केला जात आहे, आणि त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योग्य वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार धुळे महानगर पालिका प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देऊन देखील पालिका प्रशासना कडून कुठल्याही प्रकारची ठोस उपाय योजना केली जात नसल्यामुळे, अखेर आज धुळे शहरातील नागरिक आणि समाजवादी पार्टीच्या वतीने तसेच संतप्त मुस्लिम नगर परिसरातील नागरिकांनी पालिका आयुक्तांच्या कार्यालयातच हंडा मोर्चा नेला आहे. त्याचबरोबर यापूर्वी देखील पालिका प्रशासनातर्फे खोटी आश्वासने देण्यात आल्यामुळे संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला की, आता जोपर्यंत पाणीपुरवठा केला जात नाही, तोपर्यंत आयुक्तांच्या कार्यालया बाहेरच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय देखील या आंदोलकांनी घेतला. या नागरिकांनी घेतला या पवित्रा नंतर उपायुक्त कापडणीस यांनी आपल्या कार्यालयाबाहेर येत संतप्त झालेल्या नगरसेवक व नागरिकांची समजूत काढून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे.